रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या सुदर्शन यागाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ओटी भरल्यावर सर्वत्र पांढरा प्रकाश दिसणे आणि ६ – ७ घंटे भावावस्था अनुभवणे

‘रामनाथी आश्रमात ३ दिवस ‘सुदर्शन याग’ चालू होता. यागाच्या तिसर्या दिवशी साधिका सौ. श्रावणी परब यांनी मला सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तुमची ओटी भरणार आहेत. तुमची सिद्धता करायची आहे.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझी ओटी भरत असतांना ‘दोन देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि दुसरी श्री शांतादुर्गादेवी) माझी ओटी भरत आहेत’, असे मला जाणवले. माझी ओटी भरून झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला काय वाटले ?’’ तेव्हा मला सर्वत्र पांढरा प्रकाश दिसला. मी ६ – ७ घंटे भावावस्था अनुभवत होते.’
– सौ. पार्वती केरेमणी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०१९)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !