हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा !
२ वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत प्रकरणात मृत्यूशी झुंज देणार्या अंकिता पिसुड्डे हिचा १० फेब्रुवारी २०२० या दिवशी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेला २ वर्षे पूर्ण झाली असून तिच्या दुसर्या स्मृतीदिनी लागणार्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.