
भाग्यनगर (तेलंगाणा) – पाकिस्तान आतंकवादाला प्रोत्साहन देत असून आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भाग्यनगरमध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने जगाला दाखवून दिले आहे की, शांतता आणि सलोखा यांची भाषा न समजणार्यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे ?, हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘सिंधु पाणी करार’ रहित करून भारताने ‘माणुसकी आणि करुणा गमावलेल्यांनी भारताकडून पाण्याची अपेक्षा करू नये. जे आतंकवादाला आश्रय देतात आणि मानवतेचे शत्रू आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही सिंधु नदीचे पाणी पोचू देणार नाही’, असा स्पष्ट संदेश दिला आहे.’’
पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, असे विधान केले होते.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक