‘चिंचवड देवस्थान न्यासा’कडून पोलीस आयुक्त आणि महापालिका यांना निवेदन सादर
‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीचे प्रकरण

पिंपरी (पुणे) – चिंचवड येथील प्रसिद्ध ‘श्री मोरया गोसावी मंदिरा’जवळ संकष्टीनिमित्त भरलेल्या जत्रेमध्ये ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिलेल्या वस्तूंची विक्री केली जात असल्याचा दावा एका महिलेने सामाजिक माध्यांतून केला होता. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत ‘चिंचवड देवस्थान न्यासा’चे विश्वस्त श्री. जितेंद्र रमेश देव यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ प्रभागातील अधिकारी यांना श्री. मंदार महाराज देव आणि जितेंद्र देव यांनी निवेदन सादर केले.
केवळ संकष्टी चतुर्थी, सण, उत्सव किंवा अन्य सुट्या या दिवशी कारवाई न करता ती वर्षभरासाठी करावी. मंदिर परिसर किंवा रस्त्यावर विक्रेत्यांना बसू देऊ नये. महानगरपालिकेच्या उर्दू शाळेपासून ते धनेश्वर मंदिराजवळील जुन्या पुलापर्यंत आणि जिजाऊ पर्यटन केंद्राच्या जवळ अनधिकृत विक्रेते बसून व्यवसाय करतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अशा प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये याची दक्षता घ्यावी, अशा स्वरूपाचे निवेदन सादर केले.
हे विक्रेते कोण ? याचे अन्वेषण व्हावे ! – विश्वस्तांची मागणीयापूर्वीही देवस्थानाने असे अपप्रकार होत असल्याची माहिती पोलीस प्रशासन आणि महापालिका यांना दिली होती. त्यावर ठोस कारवाई झाली नाही. अशा प्रकारांविषयी चिंचवड ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री होत असेल, तर ते विक्रेते कोण ? बांगलादेशी, रोहिंग्या याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानाचे विश्वस्त अधिवक्ता देवराज डहाळे यांनी दिली. |
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष