ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील धारकांगला (भोजपूर) गावातील श्री चामुंडा मंदिराच्या मालकीच्या भूमीवर चालू असलेल्या एका अनधिकृत धार्मिकस्थळाचे बांधकाम प्रशसनाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडले. या धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम २ वर्षांपूर्वी चालू झाले होते, तसेच तेथे वीज जोडणीही घेण्यात आली होती.
Muradabad (UP): Religious structure encroachment on Shri Chamunda Mandir land finally removed after villagers' complaints
What was the administration doing while this encroachment was built?
Why must citizens repeatedly file complaints to protect temple land?
Strict action not… pic.twitter.com/r8oTAOgCZT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
या भूमीवरून २ गटांमध्ये बराच काळ वाद चालू होता. संभाव्य तणाव लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी मंदिराच्या भूमीवर अनधिकृत धार्मिकस्थळ उभारले जात असल्याचा आरोप करून त्याविरुद्ध जिल्हा दंडाधिकार्यांकडे तक्रार केली होती. अन्वेषणाअंती ही भूमी चामुंडा मंदिराच्या नावे नोंद असल्याचे आढळून आले. यानंतर प्रशासनाने कारवाई केली. सरकारी किंवा धार्मिक भूमीवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी प्रशासनाने दिली.
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !