पोलीस पाटलाचे महिलेसमवेतचे अश्लील वर्तन म्हणजे रक्षकानेच भक्षक बनण्याचा प्रकार ! अशा व्यक्ती पदाला कलंकच आहेत ! – संपादक

सातारा, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – फलटण तालुक्यातील राजुरी गावाचे पोलीस पाटील लक्ष्मण बागाव यांनी अल्पवयीन मुलीला अश्लील भाषा उच्चारून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची नोंद घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस पाटील लक्ष्मण बागाव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३० जानेवारी या दिवशी पोलीस पाटील बागाव यांनी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिला थांबवले. ‘येत्या ७ तारखेला माझा वाढदिवस आहे. तेव्हा तू माझ्यासोबत लॉजवर चल’, अशी अश्लील इच्छा व्यक्त केली. नंतर त्याच रात्री १२ वाजता तिला घराबाहेर बोलवून तिच्याशी अश्लील वर्तन केले. ‘याविषयी कुणाकडे वाच्यता केली, तर घरातील लोकांना संपवून टाकेन’, अशी धमकी दिल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने पोलिसात नोंदवली. पोलीस पाटील बागाव यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित