हिंदु मुलीसोबत बलात्कार केल्याने ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळत असल्याचा मौलवीसह इतर बलात्कार्यांचा दावा !

नवी देहली / मेरठ – येथील ३२ वर्षीय फहीम नावाच्या मुसलमान तरुणाने साहिल असल्याचे भासवून एका हिंदु तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि नंतर तिला मेरठमधील त्याच्या घरी नेले. तिथे फहीम, त्याचे वडील, भाऊ आणि १ मौलवी यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ते म्हणायचे की, हिंदु मुलीसोबत असे केल्याने जन्नत (स्वर्ग) मिळते. संपूर्ण कुटुंबाने तिच्यावर धर्मांतरासाठी, बुरखा घालण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी दबाव टाकला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडित तरुणीला ५ वर्षे लागली, असे पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
१. पीडित तरुणीने सांगितले की, नोव्हेंबर २०२१ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची साहिलशी मैत्री झाली. मार्च २०२२ मध्ये साहिलने तिला देहलीतील बाटला हाऊस येथे नेले. तेथे साहिल आणि त्याचा एक मित्र अली यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
२. साहिलने धमकावून तिला पुन्हा बाटला हाऊस येथे बोलावले. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून तिला मेरठमधील साथला गावात त्याच्या घरी नेले. तिथे पोचल्यावर तो मुसलमान असल्याचे तिला समजले. त्याचे खरे नाव फहीम आहे. त्याच रात्री साहिल आणि नंतर त्याच्या वडिलांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. फहीमची आई तस्लीमा आणि बहीण इकरा यांनी तिला मारहाण केली.
३. काही दिवसांनंतर फहीमची आई आणि बहीण तिला अगवानपूर येथील एका मदरशात घेऊन गेल्या. फहीमचे मामा हाफिज मंजूर तिथे मौलवी होते. त्याने फहीमशी तिचा निकाह (विवाह) लावून दिला.’
४. निकाहनंतर फहीमच्या कुटुंबियांनी तिला एका मौलवीकडे नेले. तिथे त्या मौलवीने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तो मौलवी प्रतिदिन तिच्या घरी येऊ लागला. कुटुंबीय त्याला तिच्या खोलीत पाठवत असत. पुढे तो मौलवी त्याच्यासोबत आणखी लोकांनाही आणू लागला. तिने विरोध केला तेव्हा मौलवी म्हणाला, हे सर्व फुकट करत नाहीत, तुझ्या सासूला पैसे देतात.
५. पीडित तरुणीने सांगितले की, नोव्हेंबर २०२४ मध्ये फहीमचे कुटुंबासोबत काही वाद झाले. तो तिला आणि तिच्या मुलीला घेऊन बाटला हाऊसमध्ये परतला. तिथे फहीमला शस्त्रांस्त्रांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक झाली आणि नंतर त्याला कारागृहात पाठवण्यात आले.
६. त्यानंतर तिने तिच्या भावाच्या साहाय्याने आरोपी फहीम आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी या प्रकरणात फहीमसह ५ जणांना अटक केली आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी