
नवी देहली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’ने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या सलग ३ यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या. १० आणि ११ जून या दिवशी झालेल्या या चाचण्यांमध्ये इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूकपणे भेदले. त्यामुळे भारताकडे आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. यासह भारत अशा प्रकारची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असलेल्या निवडक देशांच्या गटात सहभागी झाला आहे.
याच कालावधीत नौदलासाठी विकसित करण्यात आलेल्या मध्यम पल्ल्याच्या नौकाविरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणीही यशस्वी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डी.आर्.डी.ओ.’चे अभिनंदन करत ‘यामुळे देशाची सुरक्षा सज्जता आणि संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरता अधिक बळकट होईल’, असे म्हटले आहे.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक