
गौहत्ती (आसाम) – जोरहाट हवाई दलाच्या तळावर ‘एएन्-३२’ विमान उतरत असतांना ते कोसळून ५ सैनिकांना वीरमरण आल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांचा समावेश आहे. अपघाताचे कारण शोधण्याचा आदेश चौकशी समितीला देण्यात आला आहे.

अशाच प्रकारची घटना ५ मार्चला घडली होती. आसाममधील कार्बी आंग्लाँग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे सुखोई ‘सू-३०एम्.के.आय.’ हे लढाऊ विमान कोसळून त्यातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला होता.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !