इराणने ट्रम्प यांचा दावा फेटळला

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये शांतता कराराचा प्राथमिक मसुदा सिद्ध झाला असून त्यामुळे युद्ध संपले आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केला. तथापि इराणने हा दावा फेटाळून लावत ‘करारावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही’, असे म्हटले आहे. या युद्धात सर्वांत कळीचे सूत्र असलेल्या इराणच्या अणूकार्यक्रमाविषयी अद्याप चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
१४ जून या दिवशी दोन्ही देश जिनिव्हा येथे कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद बाकेर गालिबाफ हे या वेळी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या दाव्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या (अनुमाने ८ सहस्र ५६५ रुपयांच्या) खाली घसरल्या.
काय आहे करारात ?
१. करारातील इराणची सूत्रे : अमेरिकेने इराणवरील निर्बंध हटवणे, अमेरिकेने इराणचा गोठवलेला अब्जावधी डॉलर्सचा परदेशी निधी मुक्त करणे आणि लेबनॉनमधील सैनिकी कारवाई थांबवणे, या सूत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे.
२. करारातील अमेरिकेची सूत्रे : अमेरिकेच्या बाजूने इराणने उच्च-समृद्ध युरेनियम नष्ट करणे, इराणचा अणूकार्यक्रम थांबवणे आणि आतंकवादी संघटनांना आर्थिक पाठिंबा देण्याचे थांबवणे, या सूत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan