महिलेकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होऊ नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप

आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे..

 ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार !

आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ! समाज पराकोटीचा रसातळाला गेल्याचे उदाहरण !

महिला सुरक्षेच्या प्रश्नी २ दिवसांचे अधिवेशन घ्यावे !

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना २ दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

संस्कार आणि शिक्षा आवश्यक !

कुठेही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास त्यामध्ये पुढाकार घेऊन संबंधित मुलाला कठोर शिक्षा कशी होईल, हे पहायला हवे. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी संस्कार आणि शिक्षा दोन्ही आवश्यक आहे.

जावळी (जिल्हा सातारा) येथील वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जावळी तालुक्यात एका ६५ वर्षीय वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर बळजोरी करत तिचे लैंगिक शोषण केले. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयितास पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

उल्‍हासनगर येथे ६ वर्षांच्‍या चिमुरडीवर बलात्‍कार, आरोपीला १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्यांत कठोरात कठोर शिक्षा जलद आणि सातत्‍याने झाल्‍या तर गुन्‍ह्यांचे प्रमाण अल्‍प होऊ शकते !

चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून आरोपी पसार

नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

साकीनाका येथील महिलेवर अत्याचार प्रकरणाचा उलगडा

साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील महिला आणि आरोपी हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. तसेच त्यांच्यातील देवाण-घेवाणीच्या वादातून आरोपीने या महिलेवर अत्याचार करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे.

मुंबईतील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात निर्भया पथक स्‍थापन करण्‍याचे आदेश

सर्व पोलीस ठाण्‍यांमध्‍ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्‍थापन करण्‍यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्‍यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

साकीनाका येथील महिलेवरील बलात्कार प्रकरणी एका मासात आरोपपत्र प्रविष्ट करा ! – मुख्यमंत्री

या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलदगती न्याय काय असतो, ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे; जेणेकरून पुढे कुणी असे धाडस करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची सिद्धता करावी.