उल्‍हासनगर येथे ६ वर्षांच्‍या चिमुरडीवर बलात्‍कार, आरोपीला १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

  • बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्यांत कठोरात कठोर शिक्षा जलद आणि सातत्‍याने झाल्‍या तर गुन्‍ह्यांचे प्रमाण अल्‍प होऊ शकते !
  • धर्माचरणी समाजात व्‍यक्‍ती अधिक नैतिक असल्‍याने गुन्‍ह्यांचे प्रमाण अल्‍प असते !
  • असुरक्षित उल्‍हासनगर !

ठाणे, १८ सप्‍टेंबर (वार्ता.) – उल्‍हासनगर येथे आजी-आजोबांच्‍या घरी खेळण्‍यासाठी जात असलेल्‍या ६ वर्षांच्‍या मुलीवर मामाने अत्‍याचार केल्‍याची घटना उघड झाल्‍यावर हिललाईन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पोलिसांनी काही घंट्यांतच आरोपी ३१ वर्षीय मामाला अटक केली असून भादवी ३६७ (अ) (ब) पोक्‍सो कायद्याच्‍या अंतर्गत गुन्‍हा नोंद केला आहे. आरोपीला न्‍यायालयाने १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उल्‍हासनगर येथे गुन्‍हेगारीत वाढ झाली असून गेल्‍या काही दिवसांपासून बलात्‍काराच्‍या घटनेने शहर हादरून गेले आहे.