श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्ती दान या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवू नये !

नंदुरबार येथे नगर परिषदेकडे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी !

नंदुरबार नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिकार्‍यांना निवेदन देतांना गणेशभक्‍त आणि कार्यकर्ते

नंदुरबार – गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने मूर्तीदान आणि कृत्रिम हौद यांसारख्‍या मोहिमा राबवल्‍या जात आहेत. याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवावी. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्ती दान या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवू नये, यासाठी नंदुरबार नगर परिषदेचे मुख्‍य अधिकारी अमोल बागुल यांच्‍या वतीने श्री. सुनील चौधरी यांना हिंदु जनजागृती समिती आणि गणेशभक्‍त यांच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सतीश बागुल, आकाश गावित, हर्षल देसाई उपस्‍थित होते.