हिंदु जनजागृती समितीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेट्स’ लावून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते. शासनाचे विविध निर्णय, तसेच न्यायालयाचे विविध निर्णय यांत प्रबोधन करण्याविषयी सुचवले आहे. ‘बॅरिकेट्स’ लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी करणे ही भाविकांवर बळजोरी आहे. तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे. पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात मूर्तीविसर्जन करण्यास आठकाडी आणू नये, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.
या प्रसंगी सकल हिंदु समाजाचे श्री. सुनील ताडे, श्री. सूरज रजपूत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे उपस्थित होते. या निवेदनावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शंकरराव कुलकर्णी यांची स्वाक्षरी असून त्यांनी समितीच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकार्यांच्या समवेत चर्चा करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन महामंडळ
या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनाही देण्यात आले. त्यांनी या संदर्भात कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्यांच्या समवेत होणार्या बैठकीत यातील विषयांवर चर्चा करू, असे आश्वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. मधुकर नाझरे आणि हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई उपस्थित होते.
संपादकीय भूमिकानैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करायला मिळण्यासाठी धर्माभिमान्यांनी संघटितपणे प्रयत्न करावे ! |