भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी

यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे लोणंद येथे आज नीरा नदीत स्नान होणार !

वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणे येथे उत्साहाने स्वागत !

स्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

वारकर्‍यांनो, स्वतः भजन, कीर्तन अन् वारी करण्यासह समष्टी साधना म्हणून इतरांनाही साधना शिकवा !

‘महायोग पीठ’ असलेले पंढरपूर… !

मृत्यूपूर्वी वृत्रासुराने ‘तू वीट होशील’, असा इंद्राला शाप दिला. हीच वीट पंढरपूरला विठ्ठलाच्या पायाखाली आहे. श्रीहरीने चंद्र राजाला जिथे दर्शन दिले, त्या ठिकाणाला ‘विष्णुपादतीर्थ’ असे नाव पडले.

वारी

गेली जवळजवळ १० शतके पंढरपूरच्या वारीने समाजमनाला भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांची वैचारिक पृष्ठभूमी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, समग्र भारतवर्षात पांडुरंगाचे भक्त आढळतात.

विश्वबंधुत्वाचा संकल्प करून आनंदवारीत सहभागी होण्यातच सध्याच्या पिढीचे हित !

हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, सर्व स्थावर-जंगमात्मक जगात मीच एक भासतो, असे ज्ञान ज्याच्या बुद्धीत दृढ झालेले असते.