राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी

कागल (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु धर्म शाश्वत असतांना देशाच्या सर्वाेच्च सभागृहात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदु समाज म्हणजे हिंसा, असत्य, द्वेष अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तरी अशी द्वेषपूर्ण वक्तव्ये करणार्‍या राहुल गांधी यांची खासदारकी रहित करून त्यांना निवडणूक लढवण्यास कायमस्वरूप बंदी घालावी. महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे येथील वारकरी बंधू क्रोधीत झाले असून त्यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना देण्यात याव्यात, अशा मागणीचे राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कागल तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख श्री. विनायक आवळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कागल तालुका कार्यवाह श्री. विजय आरेकर, सर्वश्री प्रभाकर थोरात, सुशांत शिंदे, शरद गायकवाड, अरुण कुलकर्णी, संभाजी संकपाळ यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.