वारी

जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे’, असे समजावे. हा माझा भक्तीयोग आहे, असे निश्चित समज !

पंढरपूरच्या तळघरात विठ्ठलाची प्राचीन मूर्ती सापडल्याचा अपप्रचार बंद करा ! – ह.भ.प. वाघ महाराज, पंढरपूर

‘श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराच्या डागडुजीचे काम गेले अडीच महिने चालू आहे. हे काम चालू असतांना तेथील तळघरामध्ये काही मूर्ती सापडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यात माध्यमांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसल्याचे दिसून आले आहे.

सनातन आश्रम बघितल्यावर खर्‍या अर्थाने गोवादर्शन झाले ! – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर

सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे.आश्रम शिस्तबद्ध असून पुष्कळ शिकायला मिळाले. आम्ही येथे येऊन उपकृत झालो, असे उद्गार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि अर्ध्वयू ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी काढले.

श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह साहित्याला चांदीची झळाळी !

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील २७ व्यापारी आणि कारागीर यांनी पालखी रथासह साहित्यालाही झळाळी दिली आहे. हे सर्वजण सद्गुरुदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत.

वारकरी दिंड्यांना अनुदान देण्यासाठी माहिती संकलिक करण्याचे काम चालू ! – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना आध्यात्मिक आघाडी

राज्यातील नोंदणीकृत दिंड्यांना राज्यशासनाने २० सहस्र रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंत्रालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे.

नोंदणीकृत वारकर्‍यांच्या दिंड्यांना राज्यशासनाकडून २० सहस्र रुपये अनुदान मिळणार !

वारकरी परिषदेच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आषाढीवारी पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येतील !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘आषाढी वारी पालखी सोहळा २०२४’च्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

पालखीच्या पुणे मुक्कामात पोलिसांकडून अडवणूक झाल्यास पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठेवू !

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत आडकाठी आणणारे पोलीस दुटप्पीच !

Shri Vitthal Rukmini Temple:गाभार्‍याचे काम १० टक्केही पूर्ण नाही, तसेच कामाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढून मूळ स्वरूप देण्यासाठी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या ४५ दिवसांत केवळ ग्रॅनाईटच काढलेले आहे. गाभार्‍यातील कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही.

आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !

जगद‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळा २८ जून २०२४ या दिवशी आणि प्रस्थान दुपारी २ वाजता पार पडणार आहे.