आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर, ९ जुलै (वार्ता.) – १७ जुलैला असलेल्या पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात जातात. या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत. ४४ किंवा अधिक भाविकांनी आगाऊ आरक्षण करून बसची मागणी केल्यास त्यांना गावातून थेट यात्रेच्या ठिकाणी, तसेच परत गावापर्यंत बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रवासाच्या कालावधीत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत, या योजना लागू रहाणार आहेत. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.