सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वारकर्‍यांनो, स्वतः भजन, कीर्तन अन् वारी करण्यासह समष्टी साधना म्हणून इतरांनाही साधना शिकवा !

‘अज्ञानावर वार करतो, तो ‘वार-करी’, ही वारकर्‍यांची खरी आध्यात्मिक ओळख आहे. वारकर्‍यांच्या निरपेक्ष भक्तीमुळेच त्यांना आत्मज्ञान होते. वारकर्‍यांनो, भजन, कीर्तन, पंढरपूरची वारी यांसारख्या उपासना व्यष्टी साधनेच्या अंतर्गत येतात. आपल्याला स्वतःबरोबर समाजाचीही आध्यात्मिक उन्नती करावयाची आहे. यासाठी तुम्ही भजन, कीर्तन, प्रवचने येथे जातांना सोबत वही-पेन घेऊन जा. तेथे तुम्हाला जे शिकायला मिळेल, त्याची नोंद करून ठेवा आणि नंतर समाजात तुम्हाला जे भेटतील त्यांनाही ते सांगा. यातून तुमची समष्टी साधना हाईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले