गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी

मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.

महागड्या गाड्यांतून वस्‍तू चोरणार्‍याला अटक !

याने ‘बी.एम्.डब्‍ल्‍यू.’ गाडी फोडून त्‍यातून जवळपास २४ लाख ८ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्‍या हद्दीत असणार्‍या लीलावती रुग्‍णालयासमोर ७ ऑक्‍टोबरला घडला होता.

कल्‍याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !

नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्‍हेगार असून त्‍यांच्‍याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्‍हे नोंद आहेत.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे १० लाख रुपये किमतीच्या बस थांब्याची चोरी

काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मालवाहतुकीची वाहने चोरणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

गेल्‍या काही मासांपासून नवी मुंबई परिसरातून ‘अ‍ॅपे’ या तीनचाकी टेंपोच्‍या चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी घालून ८ लाख ४४ सहस्र रुपयांचा ऐवज कह्यात घेतला आहे.

पट्टणकोडोली येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील पैसे यांची चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !

डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी विभागाकडून ११ सहस्र कोटींची नोटीस

या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत.

सिंधदुर्ग : नांदगाव येथे २ मंदिरांत चोरी 

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! येथील श्री दिर्बादेवी आणि श्री रवळनाथ या २ मंदिरांतील दानपेट्या अज्ञाताने फोडल्या आणि आतील रोख रक्कम चोरली. नांदगाव येथील महादेव शंकर मोरये सकाळी मंदिरांत पूजेसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.