मराठवाड्यात १० कोटी १० लाख रुपयांची वीज चोरी उघड !

वीज चोरीचे प्रकार थांबवायचे असतील, तर केवळ दंड वसूल न करता दंडासह वीज चोरांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

Pune Omkareshwar Temple Theft : पुणे येथील पेशवेकालीन  ओंकारेश्‍वर मंदिरातील दानपेटी फोडून पैशांची चोरी !

ही स्‍थिती पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे ! मंदिरातील चोर्‍या थांबवण्‍यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच भाविकांची अपेक्षा !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !

माहीम येथे रहिवासी इमारतीला आग ! माहीम – येथील रहिवासी इमारतीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही घायाळ झाले नाही. चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले … Read more

Thief Returns Stolen Idols : मंदिरातून चोरी केलेली मूर्ती गुपचूप परत करत चोरट्याने मागितली क्षमा !

प्रयागराज जिल्‍ह्यातील गौघाट परिसरात असणार्‍या खसला आश्रमातील मंदिरातून मूर्ती चोरणार्‍या चोराने १ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वत: ही मूर्ती गुपचूप परत केली. चोरट्याने मूर्तीसमवेत क्षमायाचनेची चिठ्ठीही ठेवली. आता या मूर्तीची पुन्‍हा मंदिरात विधी करून स्‍थापना करण्‍यात येत आहे.

Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी

अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे कसे ? ज्यांच्याकडे मंदिरांचे रक्षण आणि देखभाल करण्याचे दायित्व आहे, तेच जर असे करत असतील, तर विश्‍वास कुणावर ठेवायचा ?

पुणे येथे खातेदाराच्‍या लॉकरमधील २ कोटी ६५ लाखांचे दागिने चोरीस !

अधिकोषातील (बँकेतील) लॉकर (सुरक्षित पेटी) खातेदाराला न सांगता परस्‍पर उघडून त्‍यातील महत्त्वाची कागदपत्रे, तसेच सोन्‍याच्‍या दागिन्‍यांसह ९ लाख ५० सहस्र रुपये असे मिळून २ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केला आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील मंदिरांतील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद !

पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे.

ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !

धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

थोडक्यात महत्त्वाचे: तिकीट निरीक्षकाला हॉकी स्टिकने मारहाण !…१ लाखांची लाच घेतांना ग्रामविस्तार अधिकारी अटकेत !….

समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !

पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !

एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले.