|
पुणे – अधिकोषातील (बँकेतील) लॉकर (सुरक्षित पेटी) खातेदाराला न सांगता परस्पर उघडून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे, तसेच सोन्याच्या दागिन्यांसह ९ लाख ५० सहस्र रुपये असे मिळून २ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार केला आहे. लष्कर भागातील ‘पंजाब नॅशनल बँके’मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी यश कपूर यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. बँकेचे व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंदर शहानी, तसेच सराफ पेढीचे मालक सतीश पंजाबी यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
लष्कर भागातील ‘अरोरा टॉवर्स’ या इमारतीमध्ये ‘पंजाब नॅशनल बँके’ची शाखा आहे. कपूर यांनी २ महिन्यांपूर्वी लॉकर पडताळणी केली होती. तेव्हा सोन्याचे दागिने, रोख रक्कम सुरक्षित होती. ६ सप्टेंबर या दिवशी कपूर यांनी पुन्हा बँकेमध्ये जाऊन लॉकरची पडताळणी केली असता हा प्रकार उघड झाला. आरोपींनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करत लॉकर उघडले. (अशी हिंमत कुणाच्या सांगण्यावरून केली जाते ? हेही शोधले पाहिजे ! – संपादक) त्यातील सोन्याचे दागिने सराफ सतीश पंजाबीला देऊन परस्पर वितळवले. हे पुरावा नष्ट करण्यासाठी केले असल्याचे कपूर यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाखातेदारांचा विश्वासघात करणार्या अधिकोषातील कर्मचार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |