कोडगु (कर्नाटक) येथे भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्‍या व्यक्तीला कोरगज्जा देवतेने केली शिक्षा ! – भक्तांमध्ये चर्चा

भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्‍याला कोरगज्जा देवतांनी शिक्षा केली असल्याची चर्चा कोडगु जिल्ह्यातील सुंटिकोप्पाच्या केदकल गावात ऐकू येत आहे.

नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात चोरी !

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार्‍या बंगल्यात चोरी होतेच कशी ? अशी पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांच्या घरांचे रक्षण काय करणार ?

दौंड (जिल्हा पुणे) येथील दत्त मंदिरातील साहाय्यक व्यवस्थापकानेच दानपेटीतील पैसे चोरले !

मंदिराचे व्यवस्थापकच मंदिरात चोरी करतात, यातून हिंदूंचे किती प्रमाणात पतन झाले आहे, हे लक्षात येते. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

पुणे येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरात चोरी

डोबरवाडी (घोरपडी) येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून २ सहस्र रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

दाभोळे येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडल्या

दाभोळे, पोखरबाव येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडून अज्ञात चोराने अंदाजे ४ सहस्र ८०० रुपये चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी श्री. विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे.

पुणे जिल्ह्यात भरदिवसा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेवर दरोडा

या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे होणे अपेक्षित नाही. सर्व मंदिरांना सरकारने सुरक्षा द्यावी, असेच हिंदूंना वाटते !

पुण्यातील डी.एस्. कुलकर्णी यांच्या ‘ईडी’च्या कह्यातील बंगल्यात ७ लाखांची चोरी !

डी.एस्. कुलकर्णी यांनी ठेवीदारांचे पैसे न दिल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर ‘ईडी’ने हा बंगला कह्यात घेतला होता. तेव्हापासून हा बंगला बंद आहे.

लखनऊहून मुंबईला येणार्‍या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा

प्रवाशांची संख्या अधिक असूनही ते चोरट्यांसमोर काही करू शकले नाहीत ! प्रवाशांनी संघटितपणे चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तर चोरटे काही करू शकले नसते.