आगरा येथे मंदिरात चोरी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

श्री संकटमोचन हनुमान मंदिरात चोरी करणारे रिझवान कुरेशी, शाहरुख आणि इम्रान

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील पुल छिंगा मोदी भागातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात चोरी करणार्‍या रिझवान कुरेशी, शाहरुख आणि इम्रान यांना अटक करण्यात आली. रिझवान एका राजकीय पक्षाच्या अल्पसंख्यांक शाखेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या तिघांकडून मंदिरातून चोरी केलेले साहित्य जप्त केले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरात चोरी, तोडफोड, तसेच मंदिरातील मूर्तींचा अवमान कोण करते, हे यावरून लक्षात येते !