कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या चोर्‍या आणि घरफोड्या यांमुळे नागरिक त्रस्त !

असुरक्षित कल्याण-डोंबिवली शहर !

ठाणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.