कलबुर्गी (कर्नाटक) येथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या नेत्याची हत्या

हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचा संशय

मल्लिकार्जुन मुथ्याल

कलबुर्गी (कर्नाटक) – येथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी नेते मल्लिकार्जुन मुथ्याल यांची हत्या करण्यात आली. ते ६४ वर्षांचे होते. हत्येच्या एक दिवस आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार होते. त्यांचा मृतदेह त्यांच्या दुकानाजवळ सापडला. त्यांच्या दुकानातील पैसे गायब झाले आहेेत. ‘ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली आहे का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांचे पुत्र वेंकटेश यांनी सांगितले, ‘माझे वडील रात्री दुकानातच झोपत असत. ही चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे वाटते. दुकानातील पैसे चोरण्यात आले आहेत.’