वणी (यवतमाळ) येथील भंगारचोरांचे सुरक्षारक्षकावर लोखंडी सळईने आक्रमण !

येथील परिसरातील बंद असलेल्‍या पिंपळगाव कोळसा खाणीतील भंगार चोरतांना सुरक्षारक्षकांनी आडकाठी आणल्‍याने चोरट्यांनी लोखंडी सळईने सुरक्षारक्षक विशाल खंडारे यांच्‍यावर आक्रमण केले.

रत्नागिरीत भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यातील १८ सहस्र रुपयांची चोरी

भर दिवसा शहरातील टिळक आळीतील दुकानाच्या गल्ल्यामधून अज्ञाताने १८ सहस्र रुपये चोरी केले आहेत. २८ डिसेंबरच्या दुपारी २.४५ ते ३.२० या कालावधीत घडली.

सिंहगडावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आणलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे चोरीला

सिंहगडावर कचरा प्रकल्पाकरता बसवण्यात आलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे अज्ञात चोरांनी चोरल्याने गडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर चांदोर येथील जनावरे चोरीचा गुन्हा पोलिसांकडून १० मासांनी नोंद

‘नाक दाबले की तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे पोलीस !

ए.टी.एम्.मधून पैसे चोरणार्‍या हरियाणा येथील ३ धर्मांधांना सोलापूर पोलिसांनी पकडले !

किफायतशीरपणे चोरी करणार्‍या धर्मांधांची कसून चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवे ! प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध सापडतात, यावरून धर्मांधांची वृत्ती कशी आहे, हे समजते !

तुर्भे परिसरात ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी !

अद्यापपर्यंत ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी झाली आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले असून ‘परिसरातील पोलिसांची गस्त वाढवून जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भिवंडी येथे ‘ए.टी.एम्.’ यंत्र फोडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

भिवंडी येथील पूर्णा परिसरातील एका खासगी अधिकोषाचे ‘ए.टी.एम्.’ यंत्र गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आले. चोरांनी किती रक्कम चोरली, याचा आकडा समजलेला नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्‍या निवृत्त बँक कर्मचार्‍यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !

भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपहार होणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत, तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी !

लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भिंड (मध्यप्रदेश) येथे पोलिसांच्या वाहनांतील २५० डिझेलची चोरी करणारे २ पोलीस निलंबित

अशांना निलंबित नाही, तर सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे !