लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवला !
नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका शेतकर्याच्या घरी ११ नोव्हेंबरच्या रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत शेतकर्याच्या घरातून ७० तोळे सोन्याचे दागिने पळवून नेले. दरोड्यानंतर चोरट्यांना घरात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे समजले. त्यांनी जातांना सीसीटीव्हीची ‘हार्डडिस्क’ आणि दारासमोर उभे असणारे चारचाकी वाहनही नेले.
नाशिक शहर आणि परिसरात दरोड्याची ही मोठी घटना असून ४ दिवसांपूर्वी नांदुर-शिंगोटे येथे दरोडा टाकून १० ते १५ लाख रुपयांचा माल पळवला होता. यानंतरच ही घटना घडली. (लाखो रुपयांचा माल चोरूनही पोलिसांनी दरोडेखोरांवर कारवाई न केल्याने अशा घटना वारंवार घडतात. अशी निष्क्रीय पोलीस यंत्रणा काय कामाची ? – संपादक)
संपादकीय भूमिकादरोड्याच्या घटना सतत घडत असतांना दरोडेखोरांना पकडण्यात अयशस्वी ठरलेल्या पोलीस अधिकार्यांना कायमचे घरी पाठवा ! |