मारेगाव (यवतमाळ) येथून अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या २४ टन तारेची चोरी ! 

मारेगाव (जिल्‍हा यवतमाळ), १० नोव्‍हेंबर (वार्ता.) – तालुक्‍यातील कानडा शेतशिवार चौकीतील २ चौकीदारांना ७ नोव्‍हेंबरच्‍या मध्‍यरात्री शस्‍त्राचा धाक दाखवून ८ ते १० जणांनी बांधून ठेवले आणि ३२ लाख रुपये किमतीची २४ टन अ‍ॅल्‍युमिनियमच्‍या तारेची चोरी केली. चोरांनी १० चाकी २ हायवा ट्रक आणि ‘हायड्रा’ यंत्र यांचा वापर करून ८ तारांचे गुंडाळे ट्रकमध्‍ये भरले; मात्र ‘हायड्रा’ यंत्राची तार तुटल्‍याने पुढचे तार गुंडाळे न भरता ते ट्रक घेऊन पसार झाले. याची माहिती दुसर्‍या दिवशी एका नागरिकाने मारेगाव पोलिसांना दिली आणि त्‍या चौकीदारांना सोडवले. पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.