वाहनांची चोरी करणार्‍याला नालासोपारा पोलिसांकडून अटक

ठाणे – दुचाकी आणि रिक्शा यांची चोरी करणार्‍या संजय यादव या आरोपीला नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ७ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी आणि ३ रिक्शा हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.