ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – Mahant Nritya Gopal Das

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांचे चोरीच्या प्रकरणी विधान

महंत नृत्य गोपाल दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरात झालेल्या चोरीमुळे मी अत्यंत दुःखी आहे. ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आणि सर्वांना विनंती आहे की, या घटनेवरून कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते या पापात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच शिक्षा मिळवून देतील, असे निवेदन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एका पत्राद्वारे केले आहे.

महंत नृत्य गोपाल दास महाराज हे श्रीराममंदिर आंदोलनातील प्रमुख संतांपैकी एक आहेत. ते अयोध्येतील प्रसिद्ध ‘मणिराम छावणी’चेही प्रमुख आहेत. नुकतीच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.