
पणजी – आल्त पर्वरी येथील ‘हायलँड्स’ या निवासी संकुलात एकाच वेळी ७ बंगले फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी घरातील लोक झोपलेले असतांना चोरट्यांनी हायलँड्स संकुलाचे कुंपण ओलांडून आत प्रवेश केला आणि तेथील ७ वेगवेगळ्या बंगल्यांच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजे यांचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी केली. या घरफोडीमध्ये नेमकी किती मालमत्ता चोरीला गेली याचा अधिकृत आकडा समजलेला नाही. या प्रकरणी पोलिसांचे अन्वेषण चालू आहे. या निवासी संकुलाच्या सुरक्षेसाठी तब्बल ६ सुरक्षारक्षक असूनही चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात बंगल्यामध्ये चोरी केली. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर आणि संकुलाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न
पार्से येथील एका व्यक्तीची ४ लाख २६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस : अनेक ठिकाणी पडझड