Badrinath Dham Donation Theft : बद्रीनाथ धाममधील दान चोरीच्या प्रकरणी एकावर गुन्हा नोंद

प्रमोद नौटियाल

देहराडून (उत्तराखंड) – प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री बद्रीनाथ धामच्या दान चोरीच्या प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांचे निलंबित करण्यात आलेले खासगी सचिव प्रमोद नौटियाल यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (मंदिरांच्या दानाची चोरी होते, हे मंदिराच्या अन्य पदाधिकार्‍यांना कसे कळत नाही ? जर कळूनही ते याकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे ! आणि कळत नसेल, तर अशा पदाधिकार्‍यांना हाकलून लावले पाहिजे ! – संपादक)

मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रांगड यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सुगावा लागताच ३ जुलै या दिवशीच नौटियाल यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती; मात्र त्यांनी नोटिसीला दिलेले उत्तर अत्यंत संशयास्पद वाटल्याने समितीने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली. मंदिर समिती आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आणखी कुणाचा यात सहभाग आहे का ?, याचा शोध घेत आहे.

संपादकीय भूमिका

  • मंदिरांच्या पैशांची चोरी मंदिरांतील लोकांकडून होतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि ते धर्माचरण करत नसल्याने त्यांना धर्माविषयी ज्ञान अन् अभिमान नसल्यानेच ते असे कृत्य करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !