आरोपी खिसे आणि बूट यांमध्ये नोटांचे बंडल लपवतांना दिसले
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या दान चोरीच्या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये २७ एप्रिल ते ५ जून या काळात सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये सुमारे ७० संशयास्पद घटना चित्रीत झाल्या. यांमध्ये पोलिसांनी अटक केलेले ८ आरोपी नोटांची बंडले खिसे आणि बुट यांमध्ये लपवतांना दिसले. यात म्हटले आहे की, आधीपासून सिद्ध केलेल्या तपासणी प्रणालीतील त्रुटींसाठी श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा हेच उत्तरदायी आहेत. तसेच न्यासाचे महासचिव चंपत राय यांचा वाहन चालक टिन्नू कोणत्याही आदेशाविना मोजणी कक्षाची चावी स्वतःजवळ ठेवत असे. एवढेच नाही, तर त्याने शिफारस करून त्याचा पुतण्या मनीष यादव याला दानाच्या मोजणीच्या कामात लावले होते.
विशेष अन्वेषण पथकाच्या अहवालातील काही सूत्रे
१. दानाच्या मोजण्याची संपूर्ण प्रक्रियाच सदोष होती. डॉ. अनिल मिश्रा आर्थिक व्यवहार आणि रोख संकलन व्यवस्थापन यांवर लक्ष ठेवत होते. बँकेसोबत ठरवलेली मानक कार्यप्रणाली आणि सहमतीचे सूत्रे सिद्ध करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
२. मोजणी करणार्या कर्मचार्यांची तपासणी करण्यात येत नसल्याची माहिती अनिल मिश्रा यांना अंतर्गत माध्यमातून देण्यात आली होती; पण त्यानंतरही त्यांनी कोणताही प्रभावी लेखी आदेश जारी केला नाही. आधी ठरवलेल्या शोध घेण्याच्या प्रणालीतही अनिल मिश्रा यांच्यामुळेच टाळाटाळ करण्यात आली.
३. कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी, निश्चित गणवेश, वैयक्तिक वस्तू खोलीत नेण्यावर बंदी, दानपेट्या, त्यातून निघालेल्या पैशांची-नोटांची नोंद, दैनंदिन अहवालासारख्या व्यवस्था लागू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत.

Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी !
हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचारांत वाढ ! – भाजप
कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला संघाच्या नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस