
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दान चोरी प्रकरणावर भाजपचे माजी खासदार विनय कटियार यांनी म्हटले की, या प्रकरणात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय आणि पदाधिकारी गोपाल राव यांची नावे समोर आली असून अन्वेषणाच्या आधारे चंपत राय यांना पुढे कारागृहातही जावे लागू शकते. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहे आणि सर्व काही ठीक होईल. या प्रकरणात आताच अंतिम निष्कर्षावर पोचणे घाईचे ठरेल, जे काही होईल ते योग्यच होईल. विशेष अन्वेषण पथक एकाच दिवसात अन्वेषण पूर्ण करत नाही, त्यासाठी २-३ दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतोे.
कटियार पुढे म्हणाले की, गोपाल राव हा निरुपयोगी माणूस आहे. त्याचे न्यासाशी काही देणेघेणे नव्हते, तो काहीही करत नसे. त्याला येथे कुणी नियुक्त करून पाठवले, ठाऊक नाही. आम्ही कधी श्रीराममंदिरात गेलो नव्हतो; पण एक दिवस आम्ही सहज फिरत फिरत गेलो. विचार केला, बरेच दिवस झाले आहेत, प्रभु श्रीरामाचे दर्शन घेऊया. तेव्हा गोपाल राव मला म्हणाला, ‘तुम्ही कुणाच्या अनुमतीने आला आहात?’ यावर मी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !
४ सहस्र १२१ एकर इनाम भूमी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या नावे नसल्याने यात घोटाळा नाही !
Ram Temple Theft : नोटांचे बंडल चोरून सॉक्समध्ये लपवतांना दिसले ५ कर्मचारी !
E-Rickshaws : रस्त्यावरील ई-रिक्शा बंद पाडणारे चिनी ‘मोबाईल ॲप्स’ सरकारने हटवले !
Telangana DSP Corruption : तेलंगाणामध्ये पोलीस उपअधीक्षकाची २०० कोटी रुपयांची अवैध संपत्ती
कायदेशीर प्रकरणांत एआयचा वापर मानव देखरेखीखालीच हवा ! – Supreme Court