प.पू. गोविंद देव गिरि महाराज यांनी न्यासाच्या बैठकीनंतर दिली माहिती
चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे त्यागपत्र संमत !
कृष्ण मोहन यांच्याकडे महासचिव पदाचे तात्पुरते दायित्व
३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती नवा महासचिव निवडणार

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणानंतर श्रीराजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक ६ जुलैला मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, कोषाध्यक्ष प.पू. गोविंद देव गिरि महाराज, सदस्य, अयोध्येचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर प.पू. गोविंद देव गिरि यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेली चर्चा आणि घेतलेले निर्णय यांची माहिती दिली. चोरीच्या प्रकरणात न्यासाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी दिलेले त्यागपत्र संमत केल्याचे, तसेच चंपत राय यांच्या जागी सदस्य कृष्णमोहन यांना महासचिव पदाचे तात्पुरते दायित्व देण्यात आले आहे. ३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्याकडून नव्या महासचिवांची निवड केली जाणार आहे. तसेच व्यवस्था सुधारण्यासाठीच्या संदर्भात सूचना देणार आहेत, अशी माहितीही प.पू. गोविंद देव गिरि यांनी दिली. चोरीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष अन्वेषण पथकाचा अहवाल आल्यानंतर २२ जुलैला न्यासाची पुढील बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चोरीच्या प्रकरणी कुणीही अफवा पसरवू नये ! – प.पू. गोविंद देव गिरि यांचे जनतेला आवाहन
दान चोरीच्या प्रकरणात मंदिराला अर्पण करण्यात आलेले काही दागिने आणि मौल्यवान वस्तू यांचीही चोरी किंवा गहाळ झाल्याचा आरोप करण्यात येत होता. या पत्रकार परिषदेच्या ठिकाणीच आरोप केलेल्या सर्व वस्तू पत्रकारांना प्रत्यक्ष दाखवण्यात आल्या. त्यामुळे या वस्तूंची चोरी झाली नसल्याचे आणि त्यांची न्यासाकडे नोंदणी असल्याचे प.पू. गोविंद देव गिरि यांनी स्पष्ट केले. अशा २ सहस्र ८०० हून अधिक वस्तूंची न्यासाकडे नोंदणी असल्याचे स्पष्ट करत या संदर्भात कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर चुकीच्या बातम्या प्रसारित केल्यावरून टीका केली.
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
महाभारतातील पौराणिक कथा जागतिक पातळीवर नेणार्या ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचे निधन
Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’
कर्नाटक : २३० भ्रमणभाष, १७ घातक शस्त्रे आणि गांजा बाळगणार्या धर्मांधास अटक