शनिशिंगणापूर येथील मंदिर रक्षण मोहीम

श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.

भक्तांनी मंदिरांचे संरक्षण करणे आणि व्यवस्थापन पहाणे आवश्यक आहे !

मंदिरातून लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण आणि साधनामार्ग, यांकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिराचे व्यवस्थापन आणि त्याचे रक्षण, हे करणारेही कोणी नसतील. तेव्हा सर्व काही आपल्यालाच पहावे लागेल.