मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘आपण मंदिर बांधायला प्राधान्य का देत नाही ?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सध्या देशात अनेक मंदिरे आहेत. मंदिर बांधण्याच्या आधी ‘मंदिरांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि मंदिर बांधण्याचा उद्देश कसा सफल होईल ?’, हे पाहिले पाहिजे. भक्तांनी मंदिरातील देवाची पूजा आणि व्यवस्थापन पहायला हवे. मंदिरातून लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण आणि साधनामार्ग, यांकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिराचे व्यवस्थापन आणि त्याचे रक्षण, हे करणारेही कोणी नसतील. तेव्हा सर्व काही आपल्यालाच पहावे लागेल. ते करण्यासाठी, म्हणजेच भक्त होण्यासाठी साधना करावी लागणार आहे.’’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०१९)