गोव्यात शिकत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या भवितव्याविषयी चिंतेचे वातावरण

‘तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता संपादन केल्यानंतर तेथील लोकांमध्ये भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील माजी शासकीय कर्मचार्‍यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे

तालिबान त्याच्या आश्‍वासनांवर कायम राहील, अशी आशा ! – श्रीलंका

महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही विदेशी नागरिकाला हानी न पोचवणे, या तालिबानच्या आश्‍वासनांवर श्रीलंका खुश आहे.

तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांची पलायनासाठी विमानतळावर सहस्रोंच्या संख्येने गर्दी

अफगाणिस्तानमधील या घटनेविषयी आणि एकूणच स्थितीविषयी मानवाधिकार संघटना, इस्लामी देश तोंड का उघडत नाहीत ? कि मुसलमानांकडून दुसर्‍या मुसलमानांवर अत्याचार करणे त्यांना मान्य आहे ?

५६ इस्लामी देशांपैकी केवळ पाक आणि कतार यांच्याकडूनच तालिबानला समर्थन !

इस्लामी देशांची संघटना तालिबानला समर्थन देत नाही; मात्र भारतातील मुसलमान संघटना आणि काही नेते अन् वलयांकित लोक त्याला समर्थन देऊन आपण अधिक कट्टर मुसलमान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

२० वर्षांत जे काही उभारले होते, ते सर्व संपले ! – अफगाणी खासदार नरेंदर सिंह खालसा

अफगाणिस्तानमधून भारतीय वायूदलाच्या विमानाद्वारे भारतीय आणि अफगाणी लोकांना भारतात आणले जात आहे. यांतील अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंदर सिंह खालसा यांना भारतात आल्यावर अश्रू अनावर झाले.

आसाममध्ये सामाजिक माध्यमांतून तालिबानचे समर्थन करणार्‍या १४ जणांना अटक

तालिबानचे समर्थन केल्यावरून आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन आणि सी.आर्.पी.सी.च्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

जिहादी आतंकवादी संघटना तालिबानचा इतिहास

सध्या तालिबानने अफगाणिस्तानच्या (राजधानी काबुलसह) संपूर्ण भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. आता त्या ठिकाणी शरियत कायद्यानुसार कारभार चालू झाला आहे. या आतंकवादी संघटनेचा इतिहास जाणून घेऊया.

नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

अफगाणिस्तानात गेल्यावर धर्मांधाने हातात ‘मशीन गन’ घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

२० वर्षे लढूनही अफगाणिस्तानला तालिबानमुक्त करू न शकणार्‍या अमेरिकेची ही चेतावणी हास्यास्पदच ठरते !

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

ओवैसी यांना भारतीय महिलांच्या दु:स्थितीविषयी एवढीच चिंता आहे, तर त्यांनी आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज का उठवला नाही ? त्यांच्या बांधवांनी रचलेल्या षड्यंत्रावर आळा घालण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची उत्तरे ओवैसी देतील का ?