(म्हणे) ‘तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील !’

पाकच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांचे फुत्कार !

पाकिस्तानला ‘काश्मीर’ म्हणजे अफगाणिस्तान वाटले का ? अशा पाकला अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ असून त्यासाठी भारताने पावले उचलावीत ! – संपादक

इस्लामाबाद (अफगाणिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘तहरिक-ए-इंसाफ’कडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आता या पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी ‘तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून तो पाकिस्तानला देतील’, असे विधान एका खासगी दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रामध्ये केले. यापूर्वीच तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांच्यात युती असल्याचे म्हटले जात असतांना नीलम इरशाद शेख यांच्या या विधानावरून या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे.

१. नीलम शेख म्हणाल्या की, इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानचा सन्मान वाढला आहे. तालिबानी ‘ते आमच्यासमवेत आहेत’, असे सांगतात. आता ते आम्हाला काश्मीर जिंकून देतील.

२. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी ‘अफगाणिस्तानमध्ये रक्ताचे पाट वहाणारे तालिबानी हे आतंकवादी नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सारे काही नष्ट केले आहे’, असे म्हटले होते.

पाकने तालिबानला साहाय्य केल्याने ते आम्हाला साहाय्य करतील !

‘तालिबानी तुम्हाला काश्मीर जिंकून देतील’, असे तुम्हाला कुणी सांगितले’, या प्रश्नावर शेख म्हणाल्या की, भारताने आमचे तुकडे केले आहेत. आता आम्ही पुन्हा एक होऊ. आमच्या सैन्याला तालिबान सहकार्य करत आहे; कारण जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला, तेव्हा पाकिस्तानने त्यांना साहाय्य केले होते. आता ते आम्हाला साथ देतील.