अफगाणिस्तानहून भारतात यायला निघालेले १५० जण सुरक्षित !

येथून भारतात यायला निघालेल्या १५० जणांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र स्थानिक अफगाणी प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले की, हे १५० जण सुरक्षित आहेत.

अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांना बाहेर काढण्याइतकी शक्ती तुर्तास अमेरिकी सैन्याकडे नाही !  – अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची स्पष्टोक्ती

अमेरिकी नागरिक आणि संकटात असणारे अफगाणी नागरिक यांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यापासून ते काबूल विमानतळ सुरक्षित करण्यापर्यंत आवश्यक असणारे सैन्य आणि शस्त्रास्त्रे तेथील अमेरिकी सैन्याकडे तूर्तास नाहीत

‘छुपे’ तालिबानी !

‘इस्लाम खतरे में है ।’ असे विधान उघडपणे केले जाते; पण सध्याचे गढूळ वातावरण पहाता ‘भारत खतरे में है ।’ असे म्हणण्याचीच वेळ आली आहे….

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

त्यांनी दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानकडून चीनला आमंत्रण !

‘क्रौर्य’, ‘विश्‍वासघात’, ‘इतरांवर अन्याय करणे’ आदी समान ‘गुण’ असणारा तालिबान आणि चीन एकत्र आल्यास आश्‍चर्य ते काय ?

तालिबानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ किंवा विधान करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार ! – मध्यप्रदेश शासन

मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची हा अभिनंदनीय निर्णय आहे. वास्तविक असा आदेश केंद्र सरकारनेच देणे आवश्यक आहे आणि ज्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे समर्थन केले आहे, त्यांना तात्काळ अटक करून कारागृहातही टाकले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

(म्हणे) ‘तालिबान्यांनी मर्यादेचे उल्लंघन केल्यावर कारवाई करू !’ – ट्विटर

तालिबान ही आतंकवादी संघटना असतांना तिच्या आतंकवाद्यांची खाती बंद करण्याऐवजी तिला लढा देणार्‍या सालेह यांचे खाते बंद करून ट्विटरने तिची मानवताविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. जगभरातील मानवतावाद्यांनी ट्विटरवरच आता बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे !

तालिबानने भारताशी व्यापारी संबंध तोडले !

सुका मेवा महाग होण्याची शक्यता, जे तालिबानने प्रथम केले, ते भारताने करणे आवश्यक होते. भारताने तालिबानची सर्वच स्तरांवर कोंडी करून त्याला जन्माची अद्दल घडवणे आवश्यक !

तालिबानी ‘सलाम’ !

तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर भारतातील धर्मांधांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कुणी त्यांचे कौतुक करत आहे, तर कुणी तालिबान्यांनी दाखवलेल्या ‘धारिष्ट्या’ला दाद देत आहे…

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

तालिबान्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांना आता तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !