हिंदू आणि ख्रिस्ती इस्लामी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर  ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – अमेरिकेतील हार्वर्ड विश्‍वविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे दिवंगत प्रा. सॅम्युअल हंटिंग्टन यांना मी चांगले ओळखत होतो. त्यांनी वर्ष १९९४ मध्ये भिन्न संस्कृतींमध्ये होणार्‍या संघर्षावर एक छान पुस्तक लिहिले होते. त्यात ते म्हणाले होते, ‘हिंदू आणि ख्रिस्ती हे इस्लामी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील.’ सद्यःस्थिती पहाता आपण त्या दिशेने जात आहोत, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. तालिबानी आणि अन्य जिहादी आतंकवादी यांच्या विरोधात लढण्यासाठी ख्रिस्ती अमेरिका आणि युरोपीय देश अन् हिंदू बहुसंख्य असणारा भारत एकत्र येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. स्वामी यांनी हे ट्वीट केले आहे.