Loksabha Eledctions 2024 : गोवा – टपालाद्वारे करण्यात येणार्‍या मतदानाच्या पहिल्या दिवशी ८५ वर्षांवरील १ सहस्र ५८४ मतदारांनी हक्क बजावला !

टपालाद्वारे करण्यात येणारी मतदान प्रक्रिया ३ मेपर्यंत चालणार आहे. विशेष सेवेसाठी नेमण्यात आलेल्या ८ सहस्र ९४३ मतदारांपैकी २ सहस्र २४१ मतदार ३ ते ५ मे या कालावधीत त्यांना नेमून दिलेल्या केंद्रांमधून टपालाद्वारे मतदान करणार आहेत.

Loksabha Elections 2024 : कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण !

कुडाळ येथे टपाली मतदानासाठी एकूण ७८५ अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कुडाळ येथील मतदान केंद्रावर टपाली मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.

पुणे येथील इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णीची बेसुमार वाढ झाल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात !

तीर्थस्वरूप नदीची दु:स्थिती पालटण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून प्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, ही जनतेची अपेक्षा आहे.

मराठवाड्यात ‘जलजीवन’वर १ सहस्र ६७९ कोटी रुपये खर्च !

मराठवाड्यात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘नळ पाणीपुरवठा योजने’च्या कामांसाठी दीड वर्षात तब्बल १ सहस्र ६७९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तसेच ७ सहस्र १७३ पैकी केवळ १ सहस्र ६८७ गावांतील कामेच पूर्ण झाली आहेत.

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

उत्तर पश्चिम (वायव्य) येथील महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना !

उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी  ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सुहास कांदे आणि अंजली दमानिया यांना अर्ज करण्याचा अधिकार आहे  का ? – भुजबळ

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले. या निर्णयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अद्यापही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नाही.

सांगली येथील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस !

खर्च नियंत्रण कक्षात सादर केल्यानुसार ९ लाख २ सहस्र ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ सहस्र ९३३ रुपये आहे. या दोन्हीतील फरक २ लाख ७ सहस्र ५७५ रुपये आहे.

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद !

महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत.