अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई !
मुंबई – अश्लील व्हिडीओ निर्मितीद्वारे आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) उद्योगपती राज कुंद्रा यांना समन्स पाठवले आहे. कुंद्रा यांना २ डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील कार्यालयात अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यास सांगितले आहे. राज कुंद्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आहेत.
अश्लील व्हिडिआेंची निर्मिती करून विविध ‘अॅप्स’ना त्यांची विक्री केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी मुंबईसह उत्तरप्रदेश येथे काही ठिकाणी धाड घातली होती. यामध्ये मुंबईत राज कुंद्रा यांच्या कार्यालयात धाड घालण्यात आली. याच प्रकरणी राज कुंद्रा यांना यापूर्वी अटक झाली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.