|
मडगाव, १ डिसेंबर (वार्ता.) – दक्षिण गोव्यात झोड्डी, माकाझन, चांदर येथे शेतात गाय कापून मांसाची विक्री केल्याच्या प्रकरणी एकाला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर हत्या करण्यासाठी आणलेल्या एका गायीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव मैलकजान बसिरा बेपारी असे असून तो उसगाव, तिस्क, फोंडा येथील रहिवासी आहे.
२९ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ९ या कालावधीत झोड्डी, माकाझन येथे शेतात गाय कापून मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. बेपारी याच्यावर मायणा-कुडतरी पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरि अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकागोव्यात गायीच्या हत्येवर बंदी असतांना गाय कापणार्या कसायांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! केवळ कायदे करून अशा हत्या थांबणार नाहीत, तर कठोर शिक्षा झाल्यासच हे प्रकार रोखता येतील ! |