पिंपरी (पुणे) येथील ‘बलून पार्क’चे काम रखडले !

कार्यकारी अभियंता संध्या वाघ म्हणाल्या की, ‘बलून पार्क’चे काम कलात्मक असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने करावे लागते. प्रारंभी नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे २ वर्षांचा कालावधी गेल्याने काम रखडलेले आहे.

मंत्री राणे आज उमेदवारी अर्ज भरणार

मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. आता महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.  

शवपिशव्या खरेदी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन संमत !

या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांसह शवपिशव्यांचा पुरवठा करणार्‍या आस्थापनाचे संचालक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

पुणे येथे सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

‘महायुती’कडून बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला.

ऑनलाईन पश्चिम राज्यस्तरीय ‘शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा’ !

सातपुते पुढे म्हणाले की, वर्षातून एकदाच घेतल्या जाणार्‍या या संस्कृत स्पर्धेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पधर्क सहभागी होऊ शकतात.

जोतिबा भक्तांच्या वतीने ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २१ ते २४ एप्रिल या कालावधीत विनामूल्य अन्नछत्र !

प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत असून ज्यांना ‘सहजसेवा ट्रस्ट’ला साहाय्य करायचे आहे त्यांनी ९८९०९४४३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

Stone Pelting Ramnavami:देवपूर (जिल्हा धुळे) येथे रामनवमीच्या मिरणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण !

हिंदूंनो, तुमच्या मिरवणुकांसाठी तुमचे भक्कम संरक्षककवच कधी निर्माण करणार ?निष्क्रीय पोलीस प्रशासनामुळे धर्मांधांचा जमाव हिंदूंवर आक्रमण करू धजावतो !

श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !

सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.