मुंबई – ४२ व्या दुरुस्तीने राज्यघटना धर्मनिरपेक्ष करण्यात आली आहे. वक्फ मंडळाची निर्मिती मात्र धर्माच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यामुळे ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार ‘वक्फ मंडळ करावे’, अशी मागणी ‘महाराष्ट्र करणी सेने’चे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. १ डिसेंबर या दिवशी अजय सिंह सेंगर यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांना हे पत्र पाठवले आहे.
केंद्र सरकारने राज्यघटनेतील प्रावधानानुसार वक्फ मंडळाची मान्यता त्वरित रहित करावी. संसदेत चर्चा होऊ नये, यासाठी काँग्रेसने प्रशासकीय पातळीवर वक्फ मंडळाला अनुमती दिली. त्यामुळे वक्फ मंडळ रहित करण्यासाठी संसदेची मान्यता लागणार नाही, अशी मागणी श्री. अजय सिंह सेंगर यांनी या पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.