बहुतांश देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगत असल्याचा गोवा पोलिसांचा दावा

सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले असल्याने पर्यटन व्यावसायिक आनंदात आहेत; परंतु गोवा पोलिसांना मात्र एका वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. गोव्यात मजा करण्यासाठी येणारे देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगतात, असे पोलिसांना आढळून आले आहे.

सत्तरी तालुक्यात राममंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ

अयोध्येत मोठ्या प्रमाणात राममंदिराची उभारणी होणार आहे. या संदर्भातील बैठका गोव्यात चालू झाल्या आहेत. याविषयीची एक महत्त्वाची बैठक सत्तरी तालुक्यात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सात्त्विकता आणि वात्सल्यता यांचा संदेश देण्यासाठीच श्रीदत्त अवतार ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

ईश्‍वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी वर्ष २०१४ ची वेळ येऊ देऊ नये ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे.

वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान !

अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत.

हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

पू. बापूंचे शिष्य कर्तव्य म्हणून धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे चांगले कार्य करत आहेत.

ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या पाश्‍चात्त्य कुप्रथेला भारतभूमीतून हद्दपार करूया !

हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत.

ब्रिटनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता

इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.

गांजाची झाडे लावण्यासंबंधीचा प्रस्ताव ‘स्वयंपूर्ण  गोवा’चा भाग आहे का ? – गोवा फॉरवर्डचा खोचक प्रश्‍न

अलीकडेच जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर शासन जनताविरोधी धोरणांचे समर्थन करत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.