सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील माजी उपनगराध्यक्षा आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका दीपाली गोडसे यांची ‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अधिवक्ता दत्ता बनकर आदी उपस्थित होते. या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, दीपाली गोडसे यांची ‘मानव सेवा संघा’च्या जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे. त्यांच्या माध्यमातून कोणत्याही क्षेत्रातील अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळेल.