‘बैलांच्या ‘धिरयो’ला मान्यता द्यावी’, अशी पेडणे येथील काही बैलांच्या मालकांची शासनाकडे मागणी

‘इतर अवैध व्यवसाय करतात; म्हणून आम्हालाही अवैध व्यवसाय करायला द्या’, ही घातक प्रवृत्ती नष्ट करायला हवी ! सर्वच जण अवैध व्यवसाय करायला लागले, तर पृथ्वीवर गुंडांचेच राज्य येईल.

अभाविपच्या मडगाव शाखेच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद यांच्या खोलीस भेट

१२ जानेवरीला युवक दिन आणि स्वामी विवेकानंद जयंती यांनिमित्त अभाविपच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभाविपच्या मडगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी यंदा दामोदर साल कोंब येथे हा कार्यक्रम साजरा केला

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवी !

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवीची जत्रा १२ जानेवारी २०२१ या दिवशी आहे. ही देवी नवसाला पावणारी आणि सर्वांचे रक्षण करणारी आहे. श्री सटीदेवीच्या बाजूला श्री महालक्ष्मीदेवीचीही मूर्ती आहे.

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात भागधारक फौजदारी तक्रार करणार

म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले.

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

१२ ते १६ जानेवारीपर्यंत प्रतिदिन भजन, कीर्तन, प्रवचन, हळदी-कुंकू, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.

उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास फटकारले आहे.

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !

मुंबईमध्ये ‘अँटिबॉडीज्’ रोखू न शकणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याविषयी तज्ञांमध्ये मतमतांतरे

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मानवी शरिरातील प्रतिपिंडांना (अँटिबॉडीज्) भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये हा विषाणू आढळला आहे.